महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

देशात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगाने वाढत चालल्या आहेत. तर काही ठिकाणी इंधनाच्या दरांनी शंभरी पार केल्याचे दिसून आले आहे. याच कारणास्तव केंद्राच्या विरोधात विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पील अधिवेशन सोमवारी (1 मार्च) पासून पुढील 10 दिवसांसाठी सुरु होणार आहे. याच पार्श्वभुमीवर उद्या पार पडणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांसह आमदार इंधन दरवाढीच्या कारणास्तव सायकलने येणार आहेत.(Maharashtra Assembly Budget Session 2021: विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का? पाहा कोणकोणते चेहरे आहेत मैदानात)

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांसह सर्व आमदार सकाळी 10 वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सायकलवरुन विधानभवनात येणार आहे. तर केंद्र सरकारने लावलेल्या सेस मुळेच इंधन दरवाढीचा सर्वांना फटका बसत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. तर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. तसेच बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला असून दुसऱ्या बाजूला सार्वजनिक क्षेत्रांमधील उद्योग सुद्धा सरकारकडून विकले जात आहेत. या व्यतिरिक्त इंधन दर वाढ करुन तर जनतेची केंद्र सरकार लूट करत असल्याची ही टीका विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सवलत देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे नागरिकांना थोड्याप्रमाणात दिलासा मिळू शकतो. याबद्दलची माहिती अर्थखात्यामधील सुत्रांकडून दिली गेली आहे. 2018 मध्ये तेव्हाच्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ म्हणून 2 रुपयांचा सेस आकारला होता. पण आता दुष्काळ नसला तरीही तो सेस आकारला जात आहे. यामुळेच इंधनावरील सेस मध्ये थोडी कपात केली जाऊ शकते याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.