महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (Vidhansabha Monsoon Session) काल अतिरिक्त अर्थसंकल्प (Budget) सादर झाला. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) व दीपक केसर (Deepak Kesar) यांनी काल बजेटमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले .याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) खात्यातील जागांसंदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केली गेली. बजेट मध्ये मांडलेल्या प्रस्तावानुसार येत्या दिवसात पोलीस खात्यात हवालदार पदासाठी तब्बल 18,992 रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे. याशिवाय हवालदार पदासाठी अतिरिक्त 4,649 जागा वाढवण्याचे देखील प्रयोजन आहे. यंदाच्या पोलीस भरतीमध्ये नवे नियम; आता मैदानी चाचणी फक्त 50 गुणांची
या जागवाढीचा मूळ उद्देश हा नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण आणणे असणार आहे. मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात गडचिरोली समवेत अनेक ठिकाणी नक्षलवादी संघटनांचे हल्ले झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. यामध्ये पोलीस खात्यातील अनेकांना प्राण गमवावे लागले होते.गडचिरोली नक्षली हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर त्यामुळे या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा ताफा रुजू करण्याची गरज भासत होती यासाठी आता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आर्थिक निधी व तांत्रिक सुविधांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल.