Temperature| Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्र आणि मुंबईत (Mumbai) हवामानात पुन्हा वेगवेगळे बदल दिसत आहेत. यानुसार भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यभरात वेगवेगळे इशारे जारी केले आहेत, जे पाहता काही ठिकाणी लोकांना काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईत सध्या वातावरणात उष्णता वाढल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी पुढील तीन दिवसांसाठी, उष्ण आणि दमट परिस्थितीचा पिवळा इशारा जारी केला आहे. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. याआधी 11 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कमाल तापमानात हळूहळू 3-4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

रविवारी, मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत किमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला, परंतु आता पुन्हा उष्णता वाढत असल्याचे दिसत आहे. हवामान खात्याकडून पुढील काही दिवस कोणत्याही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. केवळगडचिरोली आणि चंद्रपूर येथे 10 एप्रिलला वादळासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update:

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला होता, पण आता पुन्हा तापमान वाढण्याची भीती आहे. पुण्यात, जे सहसा थंड असते, तिथेही यंदा उष्णता जाणवत आहे, आणि स्थानिकांना पाणी पीत राहण्याचा आणि घराबाहेर कमी वेळ घालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयएमडीने सांगितले की, कोकण, गोवा आणि विदर्भात उष्ण आणि दमट हवामान असेल, तर मराठवाड्यातही तापमानात 2-4 अंशांची वाढ होऊ शकते. (हेही वाचा: Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! Morbe Dam धरणात 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा, परंतु पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन)

दरम्यान, या बदलांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे. मुंबईत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवतो, आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे मुंबैकरांनी पुधिक काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही शेतकऱ्यांना शेतीच्या कामात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आहे, कारण अनपेक्षित पावसानंतर आता अनेक ठिकाणी उष्णता वाढत आहे.