Weather Update: उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; राज्यात तापमान ४० अंशांपार जाण्याची शक्यता
Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Weather Update: पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामान विभागाने स्थानिक अंदाज वर्तवला आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस असेल. महाराष्ट्रात काल मालेगांव(Malegaon) येथे ४०.८अंश सेल्सिअस कमाल तापमानाची(Temperature) नोंद झाली. तर, अहमदनगर येथे १४.३ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने(IMD), एप्रिल महिन्यात भारतात कमालीच्या तापमान वाढीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांना विशेषतः मार्च महिन्याच्या सुरुवातीस होणाऱ्या तीव्र उष्णतेचा(Heat) फटका बसणार असे सांगितले होते. (हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता; सोलापुरात सर्वाधीक तापमानाची नोंद, पारा 39 अंशांवर)

राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. कुठे अवकाळी पाऊस तर कुठे प्रचंड उकाडा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. २६- २७ मार्च २०२४ या काळात कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (हेही वाचा:Maharashtra Weather Update: पुढील 4-5 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढणार; हवामान विभागाची माहिती)

मुंबईच्या तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपनगरात सलग दोन दिवस तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ नोंदवण्यात आली. हवेतील कमी आर्द्रतेमुळे, तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा फक्त एक अंश सेल्सिअस कमी आहे. बुधवारीही उपनगरातील कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअस वर पोहोचले होते.