Rains in Maharashtra | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Forecast: बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात गोवा, रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी ऊन पडत असले तरी सायंकाळी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. विदर्भात मात्र पावसाने दडी मारली आहे. (हेही वाचा-Ashok Chavan On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकाळात देशाची कशी वाताहत झाली याचे आत्मचिंतन करावे - अशोक चव्हाण)

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारी तसेच सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार तर मराठवाडा व विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची‌ शक्यता असल्याने कोकणात जोरदार पश्चिमी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे.