Maharashtra Weather Forecast: गेल्या 24 तासात राज्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. हिंद महासागर आणि दक्षिणेकडील अरबी समुद्रात वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यातील विविध ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. याशिवाय आज मुंबई आणि ठाणेकरांना ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या 24 तासात कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. याशिवाय मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी येत्या 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबई तसेच राज्यातील विविध भागात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. (वाचा - Weather in Maharashtra: थंडीतही महाराष्ट्रात वातावरण ढगाळ; मुंबई शहरात पावसाचा हलका शिडकाव)
ढगांचा पडदा आजही ५ Jan, राज्याच्या अनेक भागात. गेल्या २४ तासात काही ठीकाणी हलका ते मध्यम पाउस. मुंबई, ठाणे पण आकाश ढगाळ.⛅⛅ pic.twitter.com/4bIQVpBAWn
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2021
कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, सातारा...⛅🌧⛅
In last 24 hrs. pic.twitter.com/enNyoRYNT4
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2021
दरम्यान, ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, कांदा पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.