Maharashtra Weather Forecast: पुढील 3-4 तास मुंबईसह उत्तर कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता- हवामान विभाग
Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

रविवारी (13 डिसेंबर) मध्यरात्रीपासून मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या -ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. एकाएकी थंडीत सुरु झालेल्या रिमझिम पावसाने मुंबईकरांची धांदल उडाली. दरम्यान मुंबईसह उत्तर कोकणात (North Konkan) पावसाचा हा जोर पुढील 3-4 तास कायम राहणार असून अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ही माहिती दिली आहे.

त्याचबरोबर पावसाची संततधार पडत असल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे धुकं पसरल्यासारखे दिसत असल्याने रस्त्यावर ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच रस्ते देखील ओले झाल्याने वाहने हळू चालवा असा सल्ला के एस होसाळीकर यांनी दिला आहे.हेदेखील वाचा- Mumbai Rains Update: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी, आजही दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता- IMD

मुंबई, ठाणे, नवी, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात मागील 3-4 तासात चांगलाच पाऊस झाला. वातावरणात आलेल्या या गारव्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या असेही आवाहनही करण्यात आले आहे. रविवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा,मालेगांव,रिसोड मध्ये रिमझिम पाऊस झाला. तर नाशिकमध्ये ढगाळ वातावरण आणि अधून-मधून तुरळक पावसाच्या सरी झाल्या. सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यामुळे वातवारण थंड झालं आहे.