Rain in Maharashtra | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात मागील आठवड्यामध्ये कडक उन्हाळ्यामुळे अनेकांना घामांच्या धारा लागल्या होत्या. पण आता मध्य महाराष्ट्र सह, मराठवाडा, विदर्भ, कोकणातही पारा खाली उतरला आहे. सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असूम हवामान खात्याकडून पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काल (9 एप्रिल) रात्री सातार्‍यामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या धारा बसरल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

IMD च्या के एस होसाळीकर (KS Hosalikar)  यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (10 एप्रिल) कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पावसासह वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. यावेळेस जोरदार वारे देखील वाहू शकतात. तर विदर्भामध्ये वीजांच्या कडकडाटासह काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील हा बदल रविवार पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

KS Hosalikar Tweet

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या वातावरणामध्ये आता उन्हाचा पारा 40 अंश पेक्षा खाली आल्याने सरासरी पेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या विदर्भ ते दक्षिण तमिळनाडू या भागातील उत्तर-दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची स्थिती आहे.