EVM | X @ANI

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम मशीन वर संशय व्यक्त केला आहे. महायुतीला एकतर्फी मिळालेल्या यशावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर सोलापूरात मरकडवाडी मध्येही मॉक पोल अंदाज घेण्यासाठी बॅलेट पेपर वर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घातला होता. पण प्रशासनाने ते मतदान बंद पाडलं. पण आता निवडणूक आयोगानेही या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट च्या स्लिप्स यामध्ये फरक आढळला नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/विधानसभा विभागात 5 कोणत्याही मतदान केंद्रांची निवड केली जाते. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची मोजणी करणे अनिवार्य असते. त्यानुसार, येथील VVPAT मशिनची मोजणी करण्यात आली आहे. 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1440 VVPAT युनिट्सच्या स्लिप्सची मोजणी करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, VVPAT स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी जुळत आहे. त्यामध्ये, कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे, मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे. MVA Boycott Assembly Oath Ceremony: महाविकासआघाडीचा विधानसभेतील शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार; EVM प्रकरणावरुन आदित्य ठाकरे आक्रमक .

निवडणूक आयोगाचा खुलासा

महाराष्ट्रात विशेष अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत कामाकाजावर, शपथविधी वर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले दिसले आहेत.