Maharashtra Unlock: अनलॉक वरुन ठाकरे सरकारचा यूटर्न, MVA सरकार स्वत:हून पडेल त्यासाठी ऑपरेशन लोटसची गरज नाही-BJP
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील अनलॉक (Maharashtra Unlock) प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने यूटर्न घेतल्याने भाजप (BJP) कडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटले की, महाविकास आघाडीत एकमत नाही आहे. खरंतर गुरुवारी राज्यातील सरकार मधील काँग्रेस मधील आमदार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी असे म्हटले की, राज्य सरकारने 5 टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रावार पासून राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन सारखे कोणतेच नियम नसणार आहेत. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले अशा पद्धतीची कोणतीच योजना तयार करण्यात आलेली नाही. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सुद्धा तेच सांगितले आणि यावर फक्त विचार सुरु असल्याचे म्हटले.

महाविकास आघाडीवर निशाणा साधत रामकदम यांनी म्हटले की, अशा गोष्टी वारंवार होत आहेत. त्यावरुन असे कळते की, तीन्ही पक्षात एकजूटता आणि एकमतेचा अभाव आहे. परिणामी राज्य सरकार कोविडच्या महासंकटाच्या परिस्थितीशी लढा देण्यास अयशस्वी ठरत आहे. काँग्रेस एक पक्ष असून दोन क्षेत्रातील पक्ष त्यांच्यावर वर्चस्व करत आहेत. पक्षाचा सन्मान आणि आत्मविश्वास कुठे गेलाय? महाविकास आघाडी पक्षात विरोधाभासाची स्थिती या सरकारला सत्तेतून बाहेर करणार आहे. सरकार पडण्यासाठी ऑपरेशन लोटसची गरज नाही.(COVID 19 In Maharashtra: टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी मेल मोटर वाहनांचे सुसज्ज रुग्णवाहिका मध्ये रूपांतर; महाराष्ट्र पोस्टल सर्कल ची माहिती)

इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पत्रकारांना फोन करुन सांगितले की, वडेट्टीवार यांचे विधान चुकीचे आहे. त्यामुळे ते प्रसारित करु नये. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देत म्हटले की, वडेट्टीवार यांचे विधान आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मंत्र्यांची आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक झाल्यानंतर लगेच समोर आले आहे. बैठकीत पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रियेबद्दल सविस्तर चर्चा झाली.(Maharashtra Unlock: राज्यातील अनलॉकच्या संभ्रमावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यासह 'या' नेत्यांची सरकारच्या कारभारावर टीका)

राज्य सरकारने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम आहे. तर ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. आता एका प्रस्तावावर चर्चा होत आहे की, लॉकडाउन मध्ये कोणत्या प्रकारे सूट दिली जावी. परंतु हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. राज्यातील अनलॉकच्या स्थिती बद्दल सरकारकडून अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहे.