Maharashtra Unlock: दुकानाच्या वेळा, मुंबई लोकल बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स
CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (2 ऑगस्ट) सांगली मध्ये आहेत. तेथे मागील काही आठवड्यात पूरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थिती नियंत्रणात असलेल्या शहारासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळता जेथे कोविड 19 आटोक्यात आहे तेथे आता व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा मिळू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यामध्ये मुख्य शहरात आता दुकानं उघडी ठेवण्याची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. लवकरच त्याचा अध्यादेश जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान दुकानांच्या वेळेसोबतच मुंबई लोकल बाबतची मुख्यमंत्र्यांनी अपडेट देताना कोरोना नियमावलीमधून हळूहळू शिथिलता मिळेल. त्यामुळे ज्यामधून मोकळीक मिळणार त्याचे परिणाम पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वांसाठी सध्याच्या टप्प्यावर सुरू केली जाणार नाही असेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील मुख्य शहरात असलेल्या कार्यालयांनाही मालकांनी वेळेचं बंधन घालून कर्मचार्‍यांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि ते शिफ्ट मध्ये काम करू शकतील शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करू शकतील असे पहावं असं आवाहन केले आहे. उद्योग धंद्यांच्या ठिकाणी देखील बायोबाबल मध्ये कर्मचारी राहतील असे पहा म्हणजे आगामी कोरोना लाटेत पुन्हा उद्योगधंदे बंद पडणार नाहीत असेदेखील त्यांनी सूचवले आहे. Mumbai Local Update: वकील आणि कोर्टातील क्लार्क यांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार; महाअधिवक्त्यांची  हायकोर्टात माहिती.

महाराष्ट्रात 25 जिल्ह्यांना लवकरच कोविड नियमांमधून शिथिलता मिळू शकते असे काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानंतरही अद्याप अधिसूचना मिळाली नसल्याने अनेक जण संभ्रमामध्ये होते. पण आज संध्याकाळपर्यंत हा संभ्रम दूर होण्याची आता स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान नियमांमधून मुभा मिळाली तरीही कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर अर्थात मास्क, हॅन्ड सॅन्टिटाईज आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कारण केंद्राच्या अहवालानुसार कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत स्थिती बिकट झाल्यास ऑक्सिजन मागील लाटेपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक लागू शकतो.