Latur: लातूर येथे दोन बहिणींची गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट
Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

लातूर (Latur) येथे दोन मावस बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर जिल्ह्याच्या हरंगुळ भागात आज घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करत आहेत. या दोघेही बेपत्ता असल्याचे तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले होते. मात्र, घरी गेल्यानंतर या दोघींनी गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

गीतांजली बनसोडे (वय, 17) आणि धनश्री क्षीरसागर (वय, 20) असे आत्महत्या केलेल्या दोन्ही मावस बहिणींचे नावे आहेत. गीतांजली आणि धनश्री या दोघीही बेपत्ता असल्याचे तक्रारी त्यांच्या पालकांनी नुकतीच पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. तसेच या दोघींना पुण्यातून गावी आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आज या दोघींनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने दिली आहे. हे देखील वाचा- Thane: छेडछाडीला विरोध केला म्हणून एका महिलेसह तिघांना मारहाण, 11 जणांना अटक

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केली आहे. ही घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामोद परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.