
Maharashtra Student Protest: मुंबईतील धारावीत सोमवारी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. त्यांच्याकडून अशी मागणी केली जात होती की. 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ऑफलाइन न ठेवता ऑनलाईन पद्धतीने घ्यावात. परंतु सरकारकडून त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांकडून सातत्याने याचा विरोध केला जात आहे. पोलिसांनी काल लाठीचार्ज सुद्धा केला. या प्रकरणी आता बिग बॉस मधील स्पर्धक, युट्युबर विकास पाठक उर्फ हिंदूस्थानी भाऊ याला अटक केली आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी उकसवल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
असे म्हटले जात आहे की, हिंदूस्थानी भाऊ यांने आंदोलनापूर्वी विद्यार्थ्यांना सरकारच्या विरोधात भडकवले आणि उकसवले. त्यानेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यास सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येत आंदोलन करण्यास सुरुवात केली. अशातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. हिंदूस्थानी भाऊ याच्या व्यतिरिक्त काही लोकांच्या विरोधात तक्रार ही दाखल करण्यात आली आहे.(Maharashtra Student Protest: दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे राज्यभर आंदोलन, विद्यार्थाच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ?)
अद्याप विद्यार्थ्यांचा राग शांत झालेला नाही. ते अजूनही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारकडे सातत्याने अपील केले जात आहे की, 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. मुंबई व्यतिरिक्त पुणे, नागपुर, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा याच मागणीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. काही ठिकाणी पोलिसांना बलाचा वापर करावा लागला.
भाजपकडून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी पाठिंबा दिला जात आहे. पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा चुकीचा असल्याचे म्हणत राज्यातील ठाकरे सरकारवर त्यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांकडून अपील केले जात आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: यामध्ये दखल घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवर त्यांनी विचार करावा.
याच दरम्यान बोर्डाने स्पष्ट केले आहे की, 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा सुद्धा ठरवलेल्या काळातच ऑफलाइन पद्धतीने होतील. 10 वी ची परिक्षा 25 फेब्रुवारी तर 12 वी ची परिक्षा 14 फेब्रुवारी पासून सुरु केली जाईल.