Maharashtra State Eligibility Test 2021 ची अॅडमीट कार्ड्स (Admit Cards) जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यात Assistant Professor पदासाठी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Sabitribai Pune Phule University) जारी करण्यात आलेल्या या अॅडमीट कार्डला डाऊनलोड करण्यासाठी तुम्हांला setexam.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट दयावी लागणार आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून घेण्यात येणारी ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील उमेदवार 26 सप्टेंबरला देणार आहेत. ही परीक्षा 2 सत्रामध्ये होईल. या परिक्षेदरम्यान उमेदवार कोविड 19 नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नक्की वाचा: TATA Steel Apprenticeship 2021: आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना टाटा स्टीलमध्ये प्रशिक्षण घेण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या कसा करता येईल अर्ज.
कसं डाऊनलोड कराल अॅडमीट कार्ड?
- setexam.unipune.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- 'Download Admit Card by Login/Application Number /Student's Name.'असं लिहलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्क्रिन वर नवी विंडो ओपन होईल. आता त्यांना क्रेडेंशिअल वापरून लॉगिन करून अॅडमिट कार्ड पाहता येणार आहे.
- या अॅडमिट कार्डची कॉपी डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा.
यंदा या परीक्षेसाठी अंदाजे 98,360 जणांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचे नाव तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. OMR sheet format मध्ये यंदाची परीक्षा होणार आहे.परीक्षेत 2 पेपर असतील ते ऑब्जेक्टीव असतील. पहिला पेपर एक तासाचा तर दुसरा दोन तासांचा असणार आहे.