Maharashtra SSC, HSC Result 2020: कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान शिक्षक, मॉडरेटर्सना प्रवासाची परवानगी,  10वी, 12वी चा निकाल 'या' तारखेपर्यंत लागण्याची शक्यता
Representational Image (Photo Credits: PTI)

Maharashtra SSC, HSC Result 2020 Date:  महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे यंदा 24 मार्च पासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत आता वाढवण्यात आला आहे. पण अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काल (5 मे) महाराष्ट्र सरकारने 10वी, 12 वी परीक्षेशी निगडीत शिक्षक, मॉडरेटर्स आणि इतर कर्मचार्‍यांना प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्र राज्य बोर्डाचा SSC, HSC Result 10 जून पर्यंत लागू शकतो. असं न्यूज एजंसी PTI च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. निकालाची तारीख ठरल्यानंतर 10वी, 12 वीचे विद्यार्थी त्यांचा निकाल maharesult.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन बघू शकतात.

कोरोना व्हायरस संकटामुळे महाराष्ट्रात यंदा दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या विषयाचे मार्क विद्यार्थ्यांना संबंधित निअयमांनुसार दिले जाणार आहेत. बारावीची परीक्षा यंदा वेळापत्रकानुसार पार पडली पण 10 वीचा भूगोलाचा पेपर सुरूवातीला पुढे ढकलण्यात आल्याची आणि नंतर रद्द झाल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आता यंदा निकालाचं काय? पुढील शैक्षणिक वर्षाचं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर पडले आहेत. अद्याप सीबीएसईचे स्थगित करण्यात आलेले पेपर आणि त्याचं वेळापत्रक याची माहिती देण्यात आलेली नाही. MHT CET 2020 Exam Dates: महाराष्ट्र सीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवली,  mahacet.org वर लवकरच नवे वेळापत्रक जाहीर होणार.

महाराष्ट्र सरकारने जीआर काढत, शिक्षक, मॉडरेटर्स आणि कॉन्ट्रॅक्टवर घेण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना परीक्षांच्या उत्तर पत्रिक यांची ने आण करण्याचा, बोर्ड परीक्षा संबंधित अधिकार्‍यांना प्रवासामध्ये मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब असेल. यंदा दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 17 लाखापेक्षा अधिक आहे.