Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील विरार (Virar) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने आपल्या जन्मदात्या मुलीला राहत्या इमारतीमधून फेकून दिल्याचे उघडीकस आले आहे. आई अल्पवयीन म्हणजे 16 वर्षांची आहे. चौकशीदरम्यान तिने सात मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बाथरुमच्या खिडकीतून नवजात बालिकेला फेकल्याचे समजले. याप्रकरणी विरार पोलिसांनी (Virar Police) तिला ताब्यात घेतले आहे. (धक्कादायक! गर्भापात करुन 5 महिन्याचे अर्भक नदीत फेकले; अनैतिक संबधातून कुमारी मातेने नवजात बाळाला जन्म दिल्याची शक्यता)

बाथरुमच्या खिडकीतून बालिकेला फेकल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी इमारतीच्या डक्टजवळ बाळ असल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ती वाचू शकली नाही. 3 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता मुलीने बालिकेला जन्म दिला. रिपोर्टनुसार, ती मुलगी आपल्या आई-वडीलांसोबत त्या इमारतीत राहते. तिने प्रेग्नेंट असल्याचे आपल्या आई-वडीलांपासून लपवले होते. त्यासाठी ती लूज कपडे वापरत असे.

या प्रकरणाची खबर रहिवाशांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर त्यांनी इमारतीतील घरे तपासण्यास सुरुवात केली. इमारतीत तीन महिला प्रेग्नेंट असल्याचे त्यांना आढळले.

दुसऱ्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रिलबाहेर रक्ताचे डाग आढळले. तसंच बाथरुममध्येही रक्ताचे डाग दिसून आले. त्यानंतर पोलिस 16 वर्षीय मुलाला डॉक्टरांकडे घेऊन गेले. सुरुवातील आरोप नाकारणाऱ्या मुलीने नंतर गुन्हाची कबुली दिली.

16 वर्षीय मुलीला बॉयफ्रेंड असल्याचे चौकशी दरम्यान पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर 25 वर्षीय बॉयफ्रेंडची देखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बॉयफ्रेंड विरुद्ध POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विरार पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. दरम्यान, मुलीविरुद्ध आयपीसी कलम 315 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.