राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली बैठक, शिवसेना नेते यांची गैरहजेरी
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनासाठी सध्या भाजप-शिवसेना मध्ये वाद सुरु आहेत. शिवसेनेचे नेते आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत भेट घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. याच दरम्यान शिवसेनेने राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाबाबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी गैरहजेरी लावली आहे. खरतर शिवसेना नेते आणि विधीमंडळाचे गटनेते एकनाथ शिंदे ज्या कॅबिनेट सबकेमिटी मध्ये सहभागी आहेत त्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घेता येते.

देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाबाबत चर्चा बैठकीत होणार होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी या बैठकीला गैरहजेरी लावली आहे. पण ते औरंगाबादच्या दौऱ्यासाठी निघून गेले. विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची बैठक पार पडणार होती. परंतु शिवसेना नेता आणि राज्यमंत्री विजय शिवरते यांनी बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची निवास स्थानी पोहचले.('भाजपकडून राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे'- संजय राऊत)

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. याच दरम्यान शिवसेना प्रवक्ता आणि राज्यसभा खासदार संजय राउत यांनी सत्ता स्थापनेवर गेल्या काही दिवसांपासून मोठी विधान करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी असे म्हटले की, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी पहिली संधी द्यायला हवी. मात्र त्यात ते असफल झाल्यास आम्ही आमचे सरकार स्थापन करु असे संजय राउत यांनी स्पष्ट केले आहे.