Maharashtra: राज्यपालांकडे आमच्यासाठी वेळ नाही पण भाजपच्या फायद्यामध्ये व्यस्त, संजय राऊत यांची भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका
Sanjay Raut (Photo Credits: PTI)

Maharashtra: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर लावण्यात आलेल्या वसूलीच्या आरोपांनंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भाजप नेत्यांच्या फायद्यासाठी वेळ आहे. परंतु आम्हाला भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका केली आहे. तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी खुपच व्यस्त असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.(Parambir Singh Letter Bomb: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, वसूली बद्दल लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी)

देशमुख यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरावर राऊत यांनी असे म्हटले आहे की, देशमुख यांनी स्वत:हून म्हटले की मुंबई पोलीस दलातील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर जो वसूलीचा आरोप लावला त्याचा तपास व्हायला पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल. राज्यात न्यायाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे.

पुढे राऊत यांनी म्हटले की, राज्यपालांना भेटण्यासाठी आम्ही वेळ का मागावी. पण ते ऐवढे व्यस्त आहेत की त्यांच्या येथे भाजपच्या नेत्यांचे येणे जाणे असते आणि खानपान होते. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी म्हटले की, मला याची गरज वाटत नाही.(Antila Bomb Scare Case: सचिन वाझे विरोधात NIA कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय आहे कलम)

वादात अडकलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल तपास करण्यात यावा असे स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भातील पत्र सुद्धा उद्धव ठाकरे यांना त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्री तपासाचे आदेश देत असल्यास त्याचे मी स्वागत करेन असे ही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. परंतु भाजपकडून देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.