Parambir Singh Letter Bomb: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, वसूली बद्दल लावण्यात आलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

Parambir Singh Letter Bomb: वादात अडकलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपल्यावर 100 कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणी लावण्यात आलेल्या आरोपांदरम्यान एक विधान केले आहे. देशमुख यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यात देशमुख यांनी असे म्हटले आहे की, मुंबई पोलीस दलातील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर वसूलीचे जे आरोप लावले आहेत. त्या सर्व आरोपांचा तपास करण्यात यावा. दुसऱ्या बाजूला परमबीर सिंह हे सुप्रीम कोर्टाने त्यांना दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्याने ते आता बॉम्बे हायकोर्टात धाव घेऊ शकतात.

पत्रात अनिल देशमुख यांनी असे म्हटले आहे की, आरोपांची चैकशी झाल्यास 'दूध का दूध पानी का पानी' होईल. तसेच जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौकशीचे आदेश देत असल्यास मी त्याचे स्वागत करीन. भाजप सातत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.(Param Bir Singh यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी; महाविकासआघाडी सरकारचा निर्णय)

Tweet:

तर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अवैध वसूलीचा मोठा आरोप लावला आहे. त्यांनी असे म्हटले की, अँन्टेलिया येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे थेट देशमुख यांच्या संपर्कात होते. देशमुख यांनी वाझे यांना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची अवैध वसूली करण्याचे आदेश दिले होते.(Antila Bomb Scare Case: सचिन वाझे विरोधात NIA कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय आहे कलम)

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबाआय तपासाची मागणी करणारे परमबीर सिंह बॉम्बे हायकोर्टात धाव घेऊ शकतात. तर सुप्रीम कोर्टाने सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला होता. त्याचसोबत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तपास व्हावा अशी मागणी हायकोर्टासमोर ठेवण्याचे म्हटले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने या गोष्टीवर प्रश्न उपस्थितीत केले ही, परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत देशमुख यांना पक्ष का बनविले नाही? त्यामुळे सिंह बॉम्बे हायकोर्टात जाऊ शकतात.