Maharashtra School Update: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे दिल्ली सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अशी अपेक्षा केली जात आहे, महाराष्ट्रात सुद्धा शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु आतापर्यंत यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सध्याची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक बोलावण्याची शक्यता आहे.(BMC Rules For New Year: नववर्षाच्या हेतुने BMC कडून नियमावली जाहीर, जाणुन घ्या नियम)
महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 1333 आणखी रुग्ण आढळले. जे गेल्या सात महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. सध्या प्रशासनाकडून नाइट कर्फ्यू लावला असून कोरोनाच्या संक्रमणावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 1 डिसेंबरला मुंबईतील पॉझिटिव्ही रेट वेगाने वाढून 4 टक्क्यांवर आला आहे. दिल्ली सरकारने यल्लो अलर्ट जाहीर केला असून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली. कारण पॉझिटिव्ही रेट 05 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही.(Sangli: 32 विद्यार्थिनींना कोरोना व्हायरस संसर्ग; सांगली येथील मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील घटना)
दरम्यान, महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. त्याचसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा चाचणी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात असे आश्वासन दिले होते की, सरकारकडून कोरोनाच्या परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या संदर्भात जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल.