महाराष्ट्रात मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसोबतच ग्रामीण भागातही कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने सावध पावले उचलत आगोदरच निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान, सांगली (Sangli) येथे 32 विद्यार्थ्यीनींना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती आहे. मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय (Miraj Medical College) महिला वसतीगृहातील मुलींना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. राज्यात रविवारी 1648 रुग्ण आढळले आहेत. हा आकडा लक्षात घेताल सांगलीतील वाढती रुग्णसंख्या आव्हान ठरू शकतो. दरम्यान, या विद्यार्थिनींना ओमायक्रोन संसर्ग झाला आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार, मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींना सुरुवातीला प्राथमिक त्रास होऊ लागल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. प्राप्त माहितीनुसार यापैकी 11 मुली कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तर उर्वरीत मुलींचा रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती डीन डॉक्टर सुधीर नणंदकर यांनी दिली आहे. (हेही वाचा, Omicron Variant: महाराष्ट्रात आज ओमिक्रॉनचे 26 नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 167 वर)
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना संक्रमित झाल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. ट्विटरवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली. लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ची कोविड चाचणी करुन घ्यावी.