Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आज राज्यात 8 हजार 968 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 266 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 10 हजार 221 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या राज्यात एकूण 4 लाख 50 हजार 196 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 2 लाख 87 हजार 30 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे आतापर्यंच 15 हजार 842 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. (हेही वाचा - भविष्यात साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 18 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 41 हजार 664 रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. पुणे शहरात आज नव्याने 781 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुणे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 58 हजार 304 इतकी झाली आहे.