Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 139 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 2436 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80,229 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2849 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 35,156 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. आज मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 139 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याने चिंता व्यक्त होत आहे. (हेही वाचा - भारतात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक, मागील 24 तासांत 5,355 रुग्णांची प्रकृती सुधारली; देशातील रिकव्हरी रेट 48.27%- आरोग्य मंत्रालयाची माहिती)

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 5,355 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत देशात एकूण 1,09,462 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशातील रिकव्हरी रेट 48.27% इतका आहे. सध्या देशात 1,10,960 रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.