महाराष्ट्र: येत्या 3 ऑगस्टला असणाऱ्या रक्षाबंधनसाठी खास इको-फ्रेंडली अशा गिर गाईच्या शेणापासून महिलेने बनवल्या राख्या, पहा फोटो
Cow Dung Rakhi (Photo Credits-IANS)

देशभरासह महाराष्ट्रात येत्या 3 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. परंतु सणउत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने ते यंदा साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन राज्य सरकारडून करण्यात आले आहे. याच दरम्यान एका महिलेने रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan) भारतीय जातीच्या गिर गाईच्या (Gir cow) शेणापासून (Cow Dung) राखी बनवल्या आहेत. या राख्या इको-फ्रेंडली असल्याचे ही महिलेने म्हटले आहे. त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त इको-फ्रेंडली अशी राखी बहिणीला आपल्या भावासाठी खरेदी करता येणार आहे.

प्रिती आर तांबे हा गौशाळा चालवत असून त्यांच्याकडे 200 गिर गाई आणि अन्य 150 सोडून दिलेल्या किंवा अपंग रेडे आणि बैल आहेत. शेणापासून बनवलेल्या राख्या आकर्षक आणि स्वस्त किंमतीत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.(Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन सणाला भावासाठी घरच्या घरी कशा बनवाल राखी? Watch Video)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच दरम्यान आता राज्यात श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने सणउत्सव ही साजरे करण्यात येणार आहेत. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे सणउत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येणार नाही आहेत.(Raksha Bandhan 2020: फूड ते पर्यावरणपूरक यंदा रक्षाबंधनासाठी राखी चे बाजारात उपलब्ध आहेत 'हे' हटके पर्याय!)

तांबे यांनी सुरुवातीला शेणापासून 500 राख्या बनवल्या असल्याचे सांगितले आहे. त्यांनी स्वत:हून गोंदिया आणि नागपूर येथील वितरक आणि किरकोळ विक्रेते यांना शेणापासून बनवलेल्या राख्यांचे महत्व समजवण्यासह त्यांचे मार्केटिंग सुद्धा केले. सुरुवातीला त्यांनी या शेणाच्या राख्यांबाबत संशय व्यक्त केला परंतु नंतर या शेणाच्या इको-फ्रेंडली राख्यांसाठी आपली पसंदी दर्शवल्याचे ही प्रिती यांनी म्हटले आहे.