Maharashtra Rains: मुसळधार पावसाने वैतरणा नदीवरील पूल गेला वाहून; ठाण्यात Mumbra Bypass Road चं नुकसान
Mumbra Bypass. (Photo Credits: Twitter)

ठाण्यातील वैतरणा नदीवरील (Vaitarna River)  पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे शहापूर-वाडा दरम्यान वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान या घटनेचं वृत्त समजताच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तेथे पोहचले. त्यांनी या पूलाच्या दुरूस्तीचं काम तातडीने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश दिले आहेत. नक्की वाचा: Mumbai Weather Forecast July 29: शहर व उपनगरांमध्ये मध्यम पाऊस व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता.

दरम्यान ठाण्याचे पालिकेचे रिजनल डिजास्टर मॅनेजमेंट सेलचे प्रमुख संतोष कदमयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ऐन कामाच्या वेळेस झालेल्या जोरदार पावसाने मुंब्रा बायपास रोडचे मोठे नुकसान झाले आहे.

ठाण्यात 4-5 फीट खड्डा पडल्याने त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नाशिकला जाणार्‍या रस्त्यावरही वाहतूक मंदावली आहे. मागील आठवडाभरापासून ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान अजून एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, दहिगाव मध्ये खरदी- तेम्बा वडा मार्गावरही रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे.