राज्यात सुरु असलेली मुसळधार पावसाची संततधार (Torrential Rains In Maharashtra) सुरुच आहे. राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसऱ्या बाजूला मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थिती आणि संकटाचा विचार करुन काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात आदी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर (Maharashtra Rain Update) अधिक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस चांगलाच बरसत आहे.
भारतीय हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे की, 8 ते 12 जुलै या काळात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावासामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश नागरिकांना दिले आहेत. दुसऱ्या बाजूला पाऊस समाधानकारक बसरसत असल्याने शेतकरी समाधानी आहे. रायगड जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. (हेही वाचा, Pune Rain Update: पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांच्या पाणीपातळीत 1 टीएमसीने वाढ)
हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला आहे. कृष्णा भागात सर्वाधिक पाऊस झाला आहे तर पाऊस संततधापणे रात्रभर कोसळतअसल्याने कुरुंदा गावाजवळील आसना नदीला पूर आला आहे. नदी पाणी नदीपात्रातून बाहेर पडून थेट कुरुंदा गावात शिरले आहे. अवघं गाव जलमय झाले आहे. त्यामुळे अनेकांचे संसरार पाण्याखाली गेले आहेत. जिवनावश्यक वस्तुंसह नागरिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. त्यातच भर म्हणून गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. काही ठिकाणी मोबाईलचे नेटवर्कही गेले आहे.
अतिवृष्टीची शक्यता
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमहत्त्वाचे असणार आहेत. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या शिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.