
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर बुधवारी मुंबईसह अन्य काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे दिसून आले. तर आज सुद्धा पुणे, नागपूर, अकोला, रत्नागिरी,औरंगाबादसह महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत स्कायमेट यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
पर्जन्य विशेषज्ञांच्या मते, महाराष्ट्रात वारे उलट्या दिशेने वाहत आहेत. तर ईशान्य अरबी समुद्रातपासून महाराष्ट्राच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बऱ्याच ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, गोवा आणि विदर्भात सुद्धा पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून येणार आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबईत सुद्धा गडगडाटासह तुरळक हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.(Mumbai Rain Update: मुंबई सह उपनगरीय भागात नाताळ च्या दिवशी पाऊस)
महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज
अहमदनगर, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि यवतमाळ येथे पुढील ६ ते ८ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता#Maharashtra #weather #rain #Pune #mumbai
— Skymet Marathi (@SkymetMarathi) December 26, 2019
मात्र उद्या पावसाच्या गतविधीमध्ये बहुतांश प्रमाणात घट होणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळ सरी कोसळणार आहेत. येत्या 28 डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या सर्व गतविधी कमी होणार असून आभाळ निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वायव्येकडून वारे येण्यास सुरुवात झाल्याने किमान तापमानात घट होण्याची अपेक्षा केली जात आहे.