न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेने गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे. कारण लोकशाहीमध्ये बहुमताला मोठे महत्त्व असते. कोणतेही सरकार बहुमताने सत्तेवर येणे आवश्यक असते, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या आजच्या निर्णयावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच "खरी" शिवसेना आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी 21 फेब्रुवारीला होईल तेव्हा सत्याचा विजय होईल, असे म्हटले आहे. आमच्या पक्षाला विश्वास आहे की सत्याचा विजय होईल आणि सर्वोच्च न्यायालय योग्य तो न्याय देईल. सत्ता आणि पैसा वापरून सरकार आणि राजकीय पक्ष अस्थिर होऊ शकत नाहीत. आम्हाला स्वच्छ राजकीय व्यवस्था हवी आहे, असेही राऊत म्हणाले. ठाकरे गटाची मागणी होती की, नबाम रेबिया (2016) निकालाबाबत फेरविचार व्हावा. त्यासाठी हे प्रकरण सात न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी केली होती. जी न्यायालयाने मान्य केली नाही. (हेही वाचा, हिंडेनबर्ग प्रकरणावरुन उत्तरे देण्याऐवजी राहुल गांधी यांनाच नोटीस, संजय राऊत यांचे टीकास्त्र)
ट्विट
We've full faith in the judiciary. In a democracy coming to power with a majority has huge value. We are working for the betterment of people. Hence we want the judiciary to decide on the basis of merits: Maharashtra CM Eknath Shinde on political crisis case pic.twitter.com/Qo71rCskOd
— ANI (@ANI) February 17, 2023
दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 2016 च्या नबाम रेबिया निकालाचा संदर्भ आवश्यक आहे की नाही हे 21 फेब्रुवारी रोजी खटल्याच्या गुणवत्तेसह विचारात घेतले जाईल असे सांगितले. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला गुणवत्तेवर आधारित निकालाची अपेक्षा आहे. आम्ही कायदेशीररित्या स्थापन झालेले बहुमताचे सरकार आहोत. या प्रकरणाची सुनावणी लांबवण्यासाठी विरोधकांना मोठ्या खंडपीठाची इच्छा होती, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. बहुमताच्या आधारावर आमचे सरकार स्थापन झाले. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत आहोत.