Maharashtra Police | (PTI photo)

मुंबईतील (Mumbai) शाहूनगर पोलीस स्टेशन (Shahunagar Police Station)  येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी (Amol Kulkarni) यांचं कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) निधन झाल्याचे समजत आहे. बुधवारी कुलकर्णी यांची कोव्हीड तपासणी झाली होती, आज या चाचणीचे निकाल येताच त्यांना कोरोनाची लागण झाली होती हे स्पष्ट झाले आहे. अमोल कुलकर्णी याचे वय हे अवघे 33 वर्ष इतके होते. यापूर्वी त्यांनी धारावी येथे लॉक डाऊन काळात ड्युटी केली होती, याच ठिकाणहून त्यांना या विषाणूची बाधा झाल्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने कुलकर्णी यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात पोलीस दलातील 1140 जणांना कोरोनाची लागण तर 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, अमोल कुलकर्णी हे मागील काही दिवसांपासून सुट्टीवर होते, त्यांना ताप आणि थंडी वाजत असल्याने सुट्टी देण्यात आली होती. आज सकाळी अचानक त्यांना खूपच अस्वस्थ वाटू लागले, त्यांनतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच कुलकर्णी यांचा मृत्यू झाला.

पहा ट्विट

दरम्यान, काल रात्री उशिरा सुद्धा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन माने यांचा कोरोनामुळे बळी गेला होता. मधुकर माने हे 57 वर्षीय म्हणजे 'हाय-रिस्क एज-ग्रुप' मध्ये असल्यामुळे 15 दिवसांपासून रजेवर होते.

दुसरीकडे, महाराष्ट्र पोलीस दलातील 1 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी 862 जण अॅक्टिव्ह रुग्ण असून 268 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 10 जणांचा बळी गेला आहे.