Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या युद्धात सरकारसोबत इतर अनेक हातही लढत आहेत. पोलीस, सफाई कामगार, डॉक्टर असे लोक जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशात अनेक डॉक्टरांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर माने (Madhukar Mane), वय वर्षे 57 यांचा मृत्यू झाला आहे. माने हे 'हाय-रिस्क एज-ग्रुप' मध्ये असल्यामुळे 15 दिवसांपासून रजेवर होते. मुंबई पोलिसांनी माने यांच्या जाण्याबाबत खेद व्यक्त करत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.

मुंबई पोलीस ट्वीट -

काल, कोरोना विषाणूशी दोन हात करताना स.पो.उ.नि./मुरलीधर वाघमारे (शिवडी पो.ठा.) व पो.ना./भगवान पार्टे (शिवाजीनगर पो.ठा.) यांन वीरगती प्राप्त झाले असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1,304 पोलिस कर्मचार्‍यांची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व नऊ जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे सध्या लॉक डाऊन चालू आहे. अशात या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी अनेक ठिकणी पोलीस तैनात आहेत. अनेकवेळा याच परिस्थितीमध्ये पोलीस कोरोनाला बळी पडत आहेत. (हेही वाचा: वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची BMC ची MCA ला विनंती; क्वारंटाईन सेंटर म्हणून रुपांतरीत करण्याचा बीएमसीचा मानस)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 49 रुग्ण दगावले. राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,068 इतकी झाली आहे. तर, मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 17512 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 655 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.