Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घरात थांबून त्याच्या कोरोनाच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत पोलीस दलातील 1140 जणांना कोरोनाची लागण झाली असून 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील 1 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी 862 जण अॅक्टिव्ह रुग्ण असून 268 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 10 जणांचा बळी गेला आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सध्या कोरोनाच्या परिस्थितीतील कार्य पाहता बहुमोलाचे आहे. त्यामुळे पोलीसांवर हल्ले करु नका असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोलिसांवर हल्ले केल्यास सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा नागरिकांना दिला आहे.(Coronavirus: अंबरनाथ पोलीस ठाण्यातील 4 आरोपींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर आणि आयसोलेशन सेंटरची विविध राज्यात उभारणी करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असून त्याची साखळी अद्याप तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.