कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र पोलिसांनी सादर केला एक व्हिडिओ; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. राज्यात दिवसेदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पॅरामेडिकल कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कोरोना योध्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी महाराष्ट्र पोलिसांचे कौतूक केले आहे. तसेच कोरोना विरोधातील ही लढाई एकजुटीने आपण जिंकणारच हा विश्वास वाटतो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- कौतुकास्पद! कोरोना मुळे वडील गमावलेल्या डॉक्टरने कोरोनावर मात करुन तीन वेळा केले प्लाझमा दान

अनिल देशमुख यांचे ट्वीट-

 

तसेच, राज्यात आज 11 हजार 81 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, आजपर्यंत राज्यात तब्बल 3 लाख 38 हजार 262 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 67.23 टक्क्यांवर पोहचला आहे. तर, मृत्यू दर 3.45 टक्के इतका आहे. सध्या राज्यात तब्बल 9 लाख 89 हजार 612 जण होम क्वारंटाइन आहेत. तर, 35 हजार 625 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन मध्ये आहेत.