Maharashtra Police | (File Photo)

महाराष्ट्रामध्ये मागील 4 महिन्यांपासून कोरोनाच्या विळख्यात असलेल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी व्यवस्थित ठेवता यावी म्हणून महाराष्ट्र पोलिस दल (Maharashtra Police) कार्यरत असणार्‍या अनेकांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली आहे. दरम्यान महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 236 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. तर एकाचा बळी गेला आहे. दरम्यान राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांच्या मृतांचा आकडा 98 पर्यंत पोहचला आहे.

महाराष्ट्रामध्ये मागील 4 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून फैलावणार्‍या कोरोना व्हायरसच्या विळख्यात 8958 पोलिस कर्मचारी आले होते. त्यापैकी 6962 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1898 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ANI Tweet

कोरोनची दहशत पाहता सुरूवातील कोरोना व्हायरस लॉकडाऊन बंदोबस्ताच्या ड्युटीवर 50-55 वर्षावरील आणि को मॉबिडीटी म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दूर ठेवण्यात आले होते. यासोबतच मुंबई पोलिस दलाकडून कोविड 19 मुळे बळी जाणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला खास सोयी, सवलती, आर्थिक मदत जाहीर केली आहे.