Maharashtra Police | (PTI photo)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात मागील 24 तासात आणि सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा (Coronavirus) एकही नवा रुग्ण किंंवा मृत्यु झालेला नाही अशी दिलासादायक माहिती समोर येत आहे. आजवर कोरोनामुळे महाराष्ट्राच्या पोलीस दलात एकूण 34 जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत 2  हजार 562 जणांना या जीवघेण्या विषाणूची लागण झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांमधील रुग्णांचा आकडा जरी अधिक असला तरी मागील दोन दिवसांपासून रुग्णवाढ होत नसल्याने आता कुठेतरी किंचित दिलासा मिळत आहे. कोरोनासह अन्य महत्वाच्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दुसरीकडे मुंबई पोलिस दलातील 1908 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, सुदैवाने यातील 905 जणांनी कोरोनावर मात केली असून अन्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचारांच्या दरम्यान तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या 82 जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांत 9985 नवे कोरोनाबाधित रूग्ण; COVID 19 ची लागण झालेल्यांचा एकूण आकडा 276583 वर !

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची आकडेवारी पाहायला गेल्यास लेटेस्ट अपडेटनुसार आतापर्यंत 90,787 रुग्ण रुग्ण आढळुन आले आहेत. आतापर्यंत एकूण 42,638 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत राज्यात एकुण 3289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.