435 नवे रुग्ण व 7 मृत्युंसह पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या 10,394 झाली; 10 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jun 10, 2020 11:45 PM IST
महाराष्ट्रात आज इयत्ता बारावीचे निकाल (Maharashtra HSC Results) लागणार नाहीत याबाबत शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून 10 जून रोजी बारावीचे निकाल लागणार याबाबत चर्चा होत्या, मात्र अजूनही हा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांंनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही शिक्षण मंडळाने सांगितले आहे. निकालाची तारीख कधी जाहीर होईल याबाबत अपडेट जाणुन घेण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत साईटला भेट द्या.
दुसरीकडे कोरोनामुळे देशात पुन्हा एकदा मोठी रुग्ण वाढ दिसून आली आहे. आजच्या ताज्या अपडेट नुसार देशात मागील 24 तासात 9985 इतक्या कोरोना रुग्णांची आणि 279 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2,76, 583वर पोहचली आहे. यापैकी 1,33,632 इतके ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 7745 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे . तर 1,35,206 इतक्या जणांनी कोरोनावर मात करून आपल्या घराची वाट धरली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात आता कोरोना रुग्णांच्या संख्येने चीन ला सुद्धा मागे टाकले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे तब्बल रुग्ण 90,787 आढळून आले आहेत, यापैकी 42,638 रुग्ण बरे झाले आहेत तर 3289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.