महाराष्ट्र पोलिस दलात (Maharashtra Police) मागील 24 तासात कोरोना व्हायरसचे 341 नवे रुग्ण आढळुन आल्याचे समजत आहे यानुसार आजवरच्या राज्यातील कोरोना बाधित पोलिसांंची संंख्या 15,294 इतकी झाली आहे. कालच्या संंपुर्ण दिवसात पोलिस दलातील 2 कोरोनाबाधित कर्मचार्यांंचा मृत्यु झाला आहे ज्यानुसार आजवरच्या कोरोना बळींंचा आकडा 156 इतका झाला आहे. राज्यात आताच्या घडीला पोलिस दलात तब्बल 2,832 कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 12 हजार 306 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे. यासंंदर्भात महाराष्ट्र पोलिसांंनी अधिकृत माहिती दिली आहे. Coronavirus Cases in Maharashtra: मुंबई नंतर महाराष्ट्रातील ‘या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी, पाहा जिल्हानिहाय आकडेवारी
कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासुन लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊन चे नागरीकांंनी पालन करावे यासाठी पोलिस युद्धपातळीवर कार्यरत आहेत. तसेच या कोरोना रुग्णांंच्या उपचारासाठी डॉक्टर व अन्य वैद्यकीय वर्ग सुद्धा दिवसरात्र मेहनत घेत आहे. आजवर देशभरात वैद्यकीय क्षेत्रातील सुद्धा 87000 कर्मचार्यांंना कोरोनाची लागण झाली आहे.
ANI ट्विट
341 more Maharashtra police personnel tested #COVID19 positive while 2 died in the last 24 hours. Total number of positive cases in the police force rise to 15,294 including 2,832 active cases, 12,306 recoveries & 156 deaths till date: Maharashtra Police pic.twitter.com/44FlEuF0kk
— ANI (@ANI) August 31, 2020
दरम्यान,महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीकडे पाहिल्यास सध्या राज्य 8 लाखाचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे असे दिसतेय. कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली असून मृतांचा आकडा 24,399 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यात आतापर्यंत एकूण 5,62,401 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.