महाराष्ट्रामध्ये दर मंगळवारी 'पद्मिनी' या साप्ताहिक लॉटरीचा निकाल जाहीर केला जातो. आजचं लॉटरीचं तिकीट तुम्ही देखील काढलं असेल तर आज नेमका ऑनलाईन निकाल कसा बघायचा हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर आज संध्याकाळी पहा lottery.maharashtra.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नेमका निकाल कसा बघाल? सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या साप्ताहिक लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लॉटरी महाराष्ट्र राज्यात कायदेशीर नियमांनुसार मान्यताप्राप्त आहे. नकली लॉटरीच्या जाळ्यात अडकून सामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारकडून ही लॉटरी जाहीर केली जाते. मग उद्या वर्तमानपत्रामध्ये या लॉटरी निकालाच्या आधीच ऑनलाईन 'पद्मिनी साप्ताहिक लॉटरी सोडती'चा निकाल पाहण्यासाठी पहा काय कराल.
'पद्मिनी साप्ताहिक लॉटरी सोडत निकाल' विजेत्याची रक्कम नेमकी किती?
दर मंगळवारी जाहीर करण्यात येणार्या 'पद्मिनी' लॉटरीमध्ये विजेत्याला 5 लाखाची रक्कम दिली जाते.
लॉटरीमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. बंपर लॉटरी जिंकण्याची अनेकांची इच्छा असते त्यासाठी नियमित काही लोक आपलं नशीब आजमावत असतात. लॉटरी जिंकल्यानंतरही त्याचा दावा करताना तुमचं तिकीट उत्तम स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे. खराब झालेलं, फाटलेलं तिकीट ग्राह्य धरले जात नाही. तसेच विजेत्याला आयडी कार्ड सोबत घेऊन जाणं, त्याच्यासोबत पासपोर्ट साईज फोटो लावणं आवश्यक आहे.