महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यात प्रवेशासाठी दोन्ही डोस अनिवार्य, रिपोर्ट्स नसल्यास 14 दिवस क्वारंटाइन
प्रतिकात्मक फोटो | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या काळात राज्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात प्रवेश करण्यासाठी आता एखादा प्रवासी येत असेल तर त्याने कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांना लसीकरणाचे सर्टिफिकेट सोबत असणे सुद्धा गरजेचे आहे. मात्र जर लस घेतली नसल्यास आणि निगेटिव्ह आरटी पीसीआर रिपोर्ट्स असतील तर ते रिपोर्ट सुद्धा दाखवणे जरुरी आहे. पण या नियमांचे उल्लंघन केल्यास बाहेरुन आलेल्या प्रवाशांना राज्यात 14 दिवस क्वारंटाइन मध्ये रहावे लागणार आहे.

आज तक यांनी दिलेल्या बातमीत असे म्हटले,  सरकारच्या आदेशात असे सांगण्यात आले की प्रवाशांना महाराष्ट्रात येण्यापूर्वी लसीकरणाचे सर्टिफिकेट दाखवणे अनिवार्य असणार आहे. दोन्ही लस घेणे जरुरी आहेच. पण या व्यतिरिक्त दुसरी लस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असावेत. परंतु या नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कोरोनाचे निगेटिव्ह आरटी पीसीआर रिपोर्ट दाखवावे लागणार आहेत. हे रिपोर्ट्स सुद्धा 72 तासांपूर्वीचे असावेत.(Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 6,686 नवे कोरोना रुग्ण; 158 मृत्यू)

राज्य सरकारकडून हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्याने लसीचे दोन्ही डोस न घेण्यासह त्याच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट्स नसतील तर त्याला 14 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे. सरकार कडून ही कठोर पावले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे उचलली जात आहेत. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत जी स्थिती निर्माण झाली होती ती होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.(Mumbai Diwali Celebration: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपर्यंत कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता)

दरम्यान, राज्यात डेल्टा प्लसचे सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्र सरकारने पुष्टी केली आहे की, डेल्टा प्लसच्या वेरियंटमुळे 5 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत डेल्टा प्लस वेरियंट बद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. लसीचा सुद्धा वेरियंटवर किती प्रभाव होतो यावर रिसर्च केला जात आहे. मात्र या परिस्थितीत सावधगिरी बाळगणे सुद्धा गरजेचे आहे.