Ashish Shelar Demands: महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी, आमदार आशिष शेलारांची मागणी
Ashish Shelar (Pic Credit - ANI)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप (BJP) नेत्यांविरुद्ध महाराष्ट्राच्या सत्ताधारी आघाडीने कथित कट केल्याच्या दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी बुधवारी सरकारला माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली. हे एक भयंकर षडयंत्र आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून शस्त्रांचा बेकायदेशीर वापर, पोलिस (Maharashtra Police) दलाचा गैरवापर आणि या सर्व गोष्टींचा परस्परांशी कसा संबंध आहे, हे दिसून येते. फडणवीस यांनी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) संपत्तीचाही पर्दाफाश केला आहे. हेही वाचा Mumbai: कोणत्या नियमानुसार 12 निलंबित आमदारांना महाराष्ट्र विधानसभेत परवानगी दिली? Nana Patole यांनी उपस्थित केला प्रश्न

एकूणच हा एक मोठा डाव असल्यासारखा दिसतो. त्यामुळे फडणवीसांना अतिरिक्त सुरक्षा पुरवली जावी, असे शेलार यांनी मंगळवारी विधानसभेतील भाजप नेत्याच्या भाषणाचा संदर्भ देत पत्रकारांना सांगितले. महाविकास आघाडीचे नेते, एक वकील आणि पोलिस अधिकारी यांनी रचलेल्या कथित कटाबद्दल फडणवीस यांच्या दाव्यासंदर्भात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेलार यांनी केली.

चव्हाण हा या कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला आणि फिर्यादीची सुरक्षाही वाढवण्याची मागणी केली. या कथित कटाच्या तळापर्यंत जाण्यासाठी शेलार म्हणाले की, कट प्रकरणी चव्हाण यांना कोणी भेटले हे पाहण्याची गरज आहे.