DRI पथकाकडून ड्रग्ज जप्त (Photo Credist-ANI)

मुंबईतीव DRI अधिकाऱ्यांकडून 1 किलो हिरॉइन  जप्त करण्यात आले असून त्याची किंमत जवळजवळ 3 कोटी रुपये असल्याची बाब समोर आली आहे. देशात हे हिरॉइन कुरियरच्या माध्यमातून आल्याची अधिक माहिती देण्यात आलीआहे. DRI कडून हे पार्सल NDPS अंतर्गत जप्त केले आहे. तर ड्रग्ज जप्त करण्याप्रकरणाची ही गेल्या 3 आठवड्यापासून ते आतापर्यंत पाचवी वेळ आहे. ड्रग्ज तस्करीचे गेल्या काही काळापासून प्रमाण भारतात वाढले असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(Illegal Petrol Pump in Wadala: वडाळा येथे अवैध पद्धतीने सुरु असेलल्या पेट्रोल पंपाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 6 जणांना अटक)

मुंबईच्या डीआरआय युनिटला एक आंतरराष्ट्रीय पार्सल तांझानिया मधील Dr es Salam येथून येणार होते याची माहिती मिळाली होती. या पार्सलवर नवी मुंबई असे लिहिले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार डीआरआय विभागाने सर्व माहिती जमा करत 2 डिसेंबरला त्याच्या तपासासाठी निघाले. मात्र हे पार्सल मेकअपसाठी वापरले जाणारे खोटे केस असल्याचे दिसले.(Drugs Case: Showik Chakraborty चा जामीन Special NDPS Court कडून मंजूर; 2 महिन्यांनंतर सुटका)

पार्सल आलेल्या चॉकलेटी रंगाच्या पाकिटांचा अधिक तपास डीआरडीआय कडून करण्यात आला. त्यावेळी युनिटकडे असलेल्या किटच्या माध्यमातून त्या पाकिटांची चाचणी केली असता त्यांना 1007 ग्रॅमचे त्यात हिरॉइन  असल्याचे कळले. या हिरोइनची अवैध बाजारात किंमत तब्बल 2 कोटी असल्याची माहिती देण्यात आली आहे.