Illegal Petrol Pump in Wadala: वडाळा येथे अवैध पद्धतीने सुरु असेलल्या पेट्रोल पंपाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 6 जणांना अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

Illegal Petrol Pump in Wadala: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वडाळा येथे अवैध पद्धतीने सुरु असलेल्या पेट्रोल पंपाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये पेट्रोल पंपाचा मालक अद्याप बेपत्ता आहे. आरोपीकडून फक्त डिझेल विक्री केली जात होती. ती सुद्धा माहितीमधील लक्झरी गाड्या आणि ट्रक मालकांना डिझेल हे डिस्काउंटच्या रेटमध्ये विकले जात होते. हे अवैध पेट्रोलपंप सर्विससेंटर आड चालवले जात होता. तर लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते सुरु करण्यात आले होते. पोलिसांकडून डिझेल कशा पद्धतीने या पेट्रोल पंपावर पोहचवले जात होते याचा शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी (युनिट1) विनायक मेर यांना याबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार वडाळा टीटी जवळ असलेल्या एका दशमेश सर्विस सेंटरआड कोणतीही डिझेलची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेकडून या सर्विस सेंटरवर नजर ठेवण्यात आली. त्यांनी एका लक्झरी बस आली आणि त्यात डिझेल भरले जात असल्याचे पाहिले.(भांडुप: मास्क न घातल्याच्या कारणास्तव विचारले असता महिलांनी क्लिनअप मार्शलच्या डोक्यात घातला पेवर ब्लॉक)

पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा बंद करण्यात आला होता. लक्झरी बसमध्ये 5 हजार रुपयांचे डिझेल भरल्याची पावती चालकाला दिली गेली होती. यावेळी त्यांनी तीन जणांना अटक केल्याचे मेर यांनी सांगितले. डिझेलचे दर 78 रुपये प्रति लीटर असून ही त्यांना 68 रुपयांना विक्री केले जात होते. पोलिसांना 15 हजार लीटरचे डिझेल त्यांना पेट्रोलपंपावर मिळाले.तपासादरम्यान, आरोपी तरणजित बांगा, अमरजितसिंग मल्होत्रा आणि इरफान जुनेजा यांनी असे म्हटले की त्यांना माहिती असलेल्या लोकांनाच ते इंधनाची विक्री करत होते.