औरंगाबाद येथे टिक टॉक व्हिडिओच्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे मनसे चित्रपट सेनेकडून आयोजन
Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

सध्या मोबाईल अॅप टिक टॉकची (Tik Tok) प्रचंड क्रेझ आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही याचा मोह आवरता आलेला नाही. टिक टॉकची हीच क्रेझ लक्षात घेत औरंगाबाद (Aurangabad) येथे मनसे चित्रपट सेनेने एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत टिक टॉक अॅपवर व्हिडिओ बनवायचा आहे. यातून 'टिक टॉक किंग' आणि 'टिक टॉक क्विन'ची निवड करण्यात येणार आहे. टिक टॉक अॅपवरुन आपली कला सादर करणाऱ्या मुलांना व्यासपीठ मिळावं, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे. (Tik Tok Ban In India: गूगल प्ले स्टोअरवरून टिक टॉक ऍप हटवण्याच्या निर्णयावर नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, मिम्स व्हायरल)

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेअंतर्गत 'ये रे ये रे पैसा-2' या चित्रपटातील 'आश्विनी ये ना' या गाण्यावर 15 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन संबंधित आयोजकांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. तसंच स्पर्धेच्या नियमांनुसार व्हिडिओत एकापेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. या स्पर्धेचा निकाल मनसेच्या चित्रपट सेनेच्या वेबसाईटवर 13 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. तसंच बक्षिस वितरणाचे स्थळ, दिनांक, वेळ आयोजक जाहीर करतील, अशीही माहिती देण्यात आली आहे. TikTok: सोशल मीडियावर विराट कोहली च्या टिक टॉक व्हिडिओ ची धूम, पहा (Video)

अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन मनसे चित्रपट सेनेकडून करण्यात आले असून आता मनसे हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.