Tik tok ban memes (Photo Credits: Twitter)

मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) टिक टॉक ( TikTok) या प्रसिद्ध चायनीज ऍप वर बंदी आणल्यावर नेटकऱ्यांनीही या बंदीला पाठिंबा देत टिक टॉक वापरणाऱ्यांवर शाब्दिक झोड घेतली आहे. या ऍपच्या माध्यमातून अश्लीलतेला चालना मिळते शिवाय रस्त्यात टिक टॉकचे व्हिडियो बनवताना अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.  आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट

या निर्णयानंतर जवळपास सर्वच सोशल मीडिया माध्यमांवर या बंदीवर आधारित मिम्सचे वारे वाहू लागलेत. त्यामुळे एरवी टिक टॉक मुळे प्रसिद्ध झालेली मंडळी आता ट्रोलर्सच्या मिम्समधून चांगलीच चर्चेत आहेत.

या टिक टॉक वापरकर्त्यांमध्ये अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेला मंजुल खट्टर हा ट्रोलर्सच्या हिट लिस्ट वर आहे. वेगवेगळ्या सीरिअल,चित्रपटांच्या सीन्सचे टेम्प्लेट वापरून तयार केलेले हे मिम्स सोशल मीडियावर कसा धुमाकूळ घालताहेत हे पहा..

टिक टॉक बॅन वर व्हायरल झालेले मिम्स

टिक टॉकच्या मागोमाग आता काही अंशी समान काम करणाऱ्या वीगो व लाईक या ऍप्स बद्दलही नेटिझन्स टीका करताना बघायला मिळत आहेत त्यामुळे यासंदर्भात सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.