मुंबईनंतर ठाण्यात मोठी दुर्घटना; घरांवर दरड कोसळल्याने 6 जण ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
Thane (Photo Credit: Twitter)

मुंबईत (Mumbai) तीन ठिकाणी दरड कोसळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात (Thane) मोठी दुर्घटना घडली आहे. ठाणेच्या कळवा पूर्व येथील डोंगर परिसरात दरड कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शेजाऱ्यांना चार नागरिकांना बचावता आले असून आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेत चार घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईनंतर आता ठाण्याला पावसाने झोडपून काढले आहे. ठाण्यात मागील तीन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी,  नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ देखील पाण्याखाली गेली आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पण मार्ग बदलल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. हे देखील वाचा- Navi Mumbai: नवी मुंबईत मुसळधार पाऊस, खारघरच्या डोंगरात अडकलेल्या 120 लोकांना वाचवण्यात यश

ट्वीट-

मुंबई रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. मुंबईच्या विक्रोळी, चेंबूर आणि भांडूप परिसरात एकाच दिवशी तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. ज्यात 25 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे.