Navi Mumbai (Photo Credit: ANI)

मुंबईमध्ये जोरदार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाणे शहरात मोर्चा वळवल्याने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे ठाण्याच्या सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. याचदरम्यान, नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघरच्या (Kharghar) डोंगरात अडकलेल्या 120 लोकांना वाचवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. हे सर्व लोक पिकनिक साजरी करण्यासाठी त्याठिकाणी गेले होते. परंतु, मुसळधार पावसामुळे त्यांचा परतीचा मार्ग बंद झाला. ज्यामुळे 70 हून अधिक महिला, 5 लहान मुल आणि काही पुरूष त्याठिकाणी अडकले.

खारघर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांना सकाळी पाण्याचा ओढा ओलांडण्यात यश आले. परंतु, दुपारपर्यंत हा जोराचा प्रवाह वाढला. ज्यामुळे पिकनिकसाठी गेलेल्या लोकांना परत येणे अशक्य झाले. त्यानंतर घाबरुन गेलेल्या लोकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला बोलावले घेतले. रविवारी संध्याकाळी दोन तास बचावकार्य सुरु ठेऊन त्यांना वाचवण्यात आले. हे देखील वाचा-भांडुप जलशुद्धीकरण संकुलनातील तांत्रिक दुरुस्तीनंतर आता महापालिकेकडून नागरिकांना पाणी गरम करुन पिण्याचे आवाहन

ट्वीट-

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी गेल्या अनेक दुःखद घटनांमुळे मागील महिन्यापासून खारघरमधील पांडवकडा फॉल्स आणि इतर लोकप्रिय हिल पिकनिक स्पॉट्समध्ये जाण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही अनेकजण आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी जातात. महत्वाचे म्हणजे, यापुढे या भागात आढळणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारच माळी यांनी दिला आहे.