Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), कोकणासह (Konkan) अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. जुलै महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगलाच जोर पकडला. मागील 24 तासांत कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली. आजही कोकणासह मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाचा हा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभाग प्रमुख के एस होसाळीकर यांनी केले आहे.

यासोबत मुंबईत आज दुपारी 2.14 मिनिटांनी समुद्रात 4.67 मीटरच्या (High Tide in Mumbai) लाटा उसळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. त्याचबरोबर आज मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Mumbai Rain and High Tide Today: मुंबईच्या सुमद्रात आज दुपारी 2.14 मिनिटांनी येणार भरती; शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता- BMC

दरम्यान जुलैमध्ये मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने या शहरांना झोडपून काढलं. त्यानंतर काही दिवस दडी मारुन बसलेला पाऊस 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा सक्रिय झाला. कमी-अधिक प्रमाणात बसरसत असलेल्या पावसाने काल पासून दमदार बॅटिंगला सुरुवात केली.