समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांच्या काही वक्तव्यानंतर आज महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा गदारोळ झाला. आमदार अबू आझमी यांनी ‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार दिला आहे. आपला धर्म (इस्लाम) ‘अल्लाह’शिवाय इतर कुणासमोर झुकण्याची परवानगी देत नाही, असे विधान त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर आम्ही आईसमोरही डोके झुकवत नाही, असेही ते म्हणाले.
आझमी म्हणाले की, दिल्लीत आफताब पूनावालाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर त्याच्या नावाने मुस्लिमांची बदनामी करण्यात आली. यानंतर आझमी यांनी औरंगाबादमधील राम मंदिराबाहेरील घटनेचा संदर्भ देताना सांगितले की, भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणायला हवे, अशी घोषणा तेथे देण्यात आली. यामुळे वातावरण बिघडले, पोलिसांनी दोन्ही गटांना तेथून हटवले. रात्री पुन्हा पंधरा-वीस लोक तिथे आले. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी सुरू झाली.
आझमी म्हणाले की, पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन्ही बाजूचे 250-250 लोक उपस्थित होते. मात्र फक्त एकाच धर्माच्या लोकांना अटक करण्यात आली. सपाचे आमदार अबू आझमी म्हणाले, 'सकाळ हिंदू समाजाच्या सभांमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला, मात्र या सभांमध्ये द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रामनवमीला औरंगाबादमध्ये हिंसाचार झाला, तसेच घराच्या गेटवर उभा असलेला निष्पाप मुनिरुद्दीनला पोलिसांनी गोळ्या घातल्या.'
हम वो है जिनके पूर्वजों ने इस देश के लिए अपनी जान दी, हम वो है जिन्होंने पाकिस्तान को नहीं भारत को अपना मुल्क माना। हमें इस्लाम सिखाता है की सर उसी के आगे झुकाओ जिसने ये सारा जहान बनाया। मेरे मज़हब के मुताबिक अगर मैं वंदे मातरम नहीं बोल सकता हूँ तो इस से मेरे दिल में मेरे मुल्क… pic.twitter.com/daMQOR8ZdH
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) July 19, 2023
याशिवाय अबू आझमी म्हणाले, 'आम्ही तेच आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी आपले प्राण दिले, आम्ही तेच आहोत ज्यांनी पाकिस्तानला नाही तर भारताला आपला देश मानला. ज्याने हे संपूर्ण जग निर्माण केले त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला इस्लाम शिकवतो. माझ्या धर्मानुसार जर मी वंदे मातरम म्हणून शकत नाही, त्यामुळे माझा देशाबद्दलचा आदर आणि माझ्या मनातील देशभक्ती कमी होत नाही. (हेही वाचा: शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; जाणून घ्या दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा)
अबू आझमींच्या या वक्तव्यानंतर विधानसभेत गदारोळ सुरू झाला. भाजपचे सर्व आमदार सभागृहाच्या वेलमध्ये आले आणि घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे सभापती राहुल नार्वेकर यांना सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.