Urmila Matondkar's speech on CAA. (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र सरकारकडून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडर हिचे नाव विधान परिषदेच्या सदस्य बनण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. तर राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून उर्मिलाचे नाव सदस्यत्वासाठी घोषित केले जाऊ शकते अशी चर्चा होतीच. याच पार्श्वभुमीवर एका रिपोर्टनुसार, राज्य सरकारने 12 लोकांची यादी भगत सिंग कोश्यारी यांनी पाठवली आहे. या सर्वांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेच्या जागेवर आपले स्थान मिळवता येणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांनी सुद्धा त्यांच्या पक्षातील 4 जणांची नावे दिली आहेत.

यापूर्वी राज्यपाल यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा हवाला देत या सदस्यांची नावे राखुन ठेवली होती. रिपोर्टनुसार, 12 एमएलसी च्या नियुक्तीसाठी लवकरच घोषणा केली जाऊ शकते. यापूर्वी लोकसभा निवडणूकीसाठी उर्मिला हिला उत्तर मुंबईतून काँग्रेस पक्षातून तिकिट दिले गेले होते. मात्र त्या निवडणूकीत तिचा पराभव झाला. परंतु आता शिवसेनेकडून तिला विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना आणि कंगना रनौत यांच्या मध्ये सुरु असलेल्या वादावर उर्मिला हिने सुद्धा तिच्यावर जोरदार टीका केली होती.(Chhagan Bhujbal speech Nashik: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची टोलेबाजी)

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 12 जागा या नुकत्याच जून महिन्यात रिक्त झाल्या आहेत. संविधानाच्य कलम 171 अंतर्गत राज्यपाल साहित्य, कला, विज्ञान, सहकारी आंदोलन आणि समाजसेवा यांच्याशी निगडीत 12 जणांची नावे विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी दिली जाऊ शकतात. त्यात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस राज्यपाल यांच्याकडून चार-चार नावांची शिफारस करता येते.