MLC Election 2020| Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात आज विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीचं मतदान सुरू झालं आहे. यामध्ये नागपूर, पुणे, औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी तर अमरावती, सोलापूर भागांत शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होत आहे. दरम्यान या निवडणूकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा चुरशीचा सामना होणार असल्याने अनेकांचे लक्ष या निवडणूकीच्या निकालांकडे लागले आहे. आज सकाळपासूनच एनसीपीच्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे, नितीन गडकरी यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदा कोविड 19 च्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंग पाळत आणि सुरक्षेची खबरदारी घेत मतदान पार पडत आहे. Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात.

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी कोरोना काळात खबरदारी घेत मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे.

देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते  देवेंद्र फडणवीस  यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.  सोबतच त्यांनी भाजपाचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील

रावसाहेब दानवे

नितीन गडकरी

दरम्यान या निवडणूकीचा निकाल 3 डिसेंबर दिवशी लागणार आहे. विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेसची महाविकास आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही पक्ष एकत्रित लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकजुटीला भाजपाचं आव्हान आहे. प्रामुख्याने पुण्यात निवडणूक प्रतिष्ठेची अअणि चुरशीची बनली असल्याने मतदार कुणाला कौल देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.