Maharashtra MLC Election 2020: विधान परिषदेच्या आणखी 5 जागा पुढच्या आठवड्यात रिक्त; 17 जागा कधी भरणार याबाबत उत्सुकता
Maharashtra Legislature | (Archived images)

Maharashtra Vidhan Parishad Election 2020: महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC) आणखी 5 जागा पुढच्या आठवड्यात रिक्त होत आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत या आधीच संपली आहे. त्या जागा अद्याप भरल्या नाहीत. त्यामुळे विधान परिषदेतील त्या 12 आणि पुढील आठवड्यात रिक्त होणाऱ्या 5 अशा एकूण 17 जागा रिक्त होणार आहेत. पुढच्या आठवड्यात रिक्त होणाऱ्या 5 जागांपैकी 2 जागा पदवीधर मतदारसंघ तर उर्वरीत दोन जागा शिक्षक मतदारसंघातील आहेत. सदस्यांच्या कार्यकाळाची मुदत संपल्याने या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे येत्या काळात विधान परिदेच्या 17 जगा भराव्या लागणा आहेत.

विधान परिषद कार्यकाळ संपत असलेले सदस्य

सदस्याचे नाव मतदारसंघ खालीप्रमाणे

  1. सतीश चव्हाण- औरंगाबाद, पदवीधर
  2. अनिल सोले- नागपूर, पदवीधर
  3. श्रीकांत देशपांडे- अमरावती, शिक्षक
  4. दत्तात्रय सावंत- पुणे, शिक्षक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या आधी विधान परिषद सदस्य होते. मात्र, ते विधान परिषदेवर निवडूण घेले आहेत. त्यामुळे ती जागाही ऑक्टोबर (2019) पासून रिक्तच आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोना व्हायरस संकट आहे. त्यामुळे राज्यातील विविध निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्याबाबतही राज्य सरकारकडून अद्याप हालचाल दिसत नाही. राज्यपाल भवनाकडूनही कोरोना व्हायरस स्थिती पाहता सरकारने या जागा भरण्याची घाई करुन नये अशी इच्छा व्यक्त केल्याचे समजते. (हेही वाचा, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2020: राज्यपाल कोट्यातील विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपलेले 12 आमदार; जाणून घ्या नावे)

दुसऱ्या बाजूला कोरोना व्हायरस स्थितीमुळे विधानसभा कामकाजही ठप्प आहे. राज्य सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे. मात्र, त्यावर विधिमंडळात चर्चा होत नाही. त्यातच विधिमंडळ अधिवेशनही लांबणीवर पडले आहे. त्यामुळे सरकारचे निर्णय विधिमंडळात मान्य करुन घेण्यासाठी एखादे छोटे अधिवेशन पार पडू शकते. या सर्व बाबी विचारात घेता विधान परिषदेत रिक्त असलेल्या 17 जागांचा वैधानिक कामावर विशेष परिणाम होणार नसल्याचे दिसते.